फ्लोटसम म्हणजे समुद्राच्या लाटेवरून किनाऱ्यावर वाहत येणारे तुकडे.
डेव्हिड वायझनर या भन्नाट कलाकाराचे हे भन्नाट पुस्तक.
जादुई वास्तववाद किंवा मॅजिकल रियालिजम हे दाखवण्याचा आणि ते सुद्धा पूर्णपणे शब्दहीन किंवा वॉर्डलेस पुस्तकाद्वारे हा एक सुंदर नमुना आहे.
एक छोटा मुलगा किनाऱ्यावर भटकंती करत असताना त्याला अचानक एक पाण्याखालील छायाचित्रण करणारा कॅमेरा सापडतो. त्यातील फिल्म डेव्हलप करताना त्याला अनेक विस्मयकारक व अद्भुत अशा पाण्याखालील जगाची ओळख होते. त्यात शहरे पाठीवर घेऊन फिरणारी मोठी कासवे आहेत आणि परग्रहावरील एलियन्स समुद्राच्या तळाशी सुट्टी बनवण्यासाठी आलेली दिसत आहेत.
पण गोष्ट इथेच संपत नाही. शेवटच्या फोटोत असं त्या मुलाला काय दिसतं की ज्यामुळे तो अजून एक फोटो घेऊन कॅमेरा समुद्रात सोडून देतो? हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक पहायलाच हवे.
डेव्हिड वैजनाथच्या अनेक पुस्तकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. लहान मुलांचा तर जादूवर विश्वास असतोच. पण हे पुस्तक पाहिल्यावर मोठ्या माणसांचा पण जादूवर किंवा मुलांच्या भावविश्वातील जादूच्या स्थानावर नक्कीच विश्वास बसेल.
