
Join Bookberry
Join Bookberry to track reading, unlock your AI reading guide, and earn welcome berries when you sign up.
No credit card required
विवेकानंद भारताच्या आधुनिक भविष्यवेत्त्यांच्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहेत. ते सर्वार्थाने आधुनिक मानवही आहेत, जे आपल्याच विचारांना आव्हान देतात आणि वेगवेगळे तसेच विरोधाभासी दृष्टिकोनही स्वीकारतात. त्यांची ही आधुनिकताच आज आपल्याला मोहित करते. ते इतिहासापुरते मर्यादित नाहीत किंवा कर्मकांडापुरतेही मर्यादित नाहीत. ते सातत्याने आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर आणि स्वतःवरही प्रश्न निर्माण करतात. विवेकानंदांच्या विरोधाभासांमधून, त्यांच्या शंकांवरून, त्यांच्या भीतीवरून आणि त्यांच्या अपयशांमधूनच आपल्याला त्यांच्या भव्य, संमोहित करणाऱ्या दिव्यतेची ओळख होते. ते आपल्याला ईश्वराला समजून घ्यायला शिकवतात आणि सर्वप्रथम आपण स्वतःला योग्यरीत्या समजून घ्यायला हवे, हे सांगतात. या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की, ते केवळ ईश्वराच्या समीप होते असे नाही, तर मनुष्य म्हणून ते इतके असाधारण होते की, आपण विवेकानंद आणि त्यांच्या अमर ज्ञानाकडे वारंवार परततो.
Note: Bookberry insights are powered by ChatGPT and may contain occasional inaccuracies. Sign in to leave feedback and generate new insights.